⚡कणकवली ता.०४-: ओझरम सेवा मंडळ , मुंबई कडून रू .वीस हजार किमतीची उत्कृष्ट दर्जाची व मजबूत अशी ४ टेबल जि. प. शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली .
यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व सदस्य संजय राणे, ओझरम सरपंच सौ .समृद्धी राणे , उपसरपंच प्रशांत राणे , सदस्य सुधाकर राणे उपस्थित होते .
तसेच अशोक राणे यांनी सीमेन्स ऐक्य एज्यूकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला प्रोजेक्टर व संगणक शिक्षणाबाबतची इ .१ली ते १० वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थाकरीता उपयुक्त अशी पुस्तके देणगी स्वरूपात भेट दिली .
या देणगीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शाळा ओझरम नं .१ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझरम सेवा मंडळाचे आभार व्यक्त करण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
अशोक राणे यांनी “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा , चांगले संस्कार अंगी बाणवून कर्तृत्ववान बना “* असे मुलांना मार्गदर्शन केले . तसेच पुढील आठवडयात ओझरम सेवा मंडळाच्या मार्फत* शाळा ओझरम नं .१ च्या इ .५ वी ते ७वी च्या सर्व विद्यार्थ्याकरीता वसुंधरा विज्ञान केंद्र , नेरूर येथे विज्ञान सहलीचे आयोजन* करण्यात आले आहे, असे सांगितले .
माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे तसेच कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार यांनी ही मुलांना मार्गदर्शन केले .यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप राणे , शा . व्य . समिती अध्यक्ष दिपक राणे , एल .डी. राणे, सदाशिव (बाबू ) राणे ,बाळा राणे,भाई दळवी , विनोद राणे , गणेश राणे , श्रीम .तारामती सावंत ( माई ), सौ . उत्कर्षा घाटगे , श्रीम . अनुजा नाईक , शाळेच्या मुख्या . श्रीम .स्नेहल कदम , श्रीम . श्रीया गोसावी , पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले तर आभार श्रीम .ज्योती ब्रम्हदंडे यांनी मानले .
