निरवडे ग्राम पंचायत आणि मुंबई विद्यापीठ समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील निरवडे ग्रामपंचायतच्या वतीने मुंबई विद्यापीठ परिसर,सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाच्या विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी निरवडे गावचे सरपंच सौ.सुहानी गावडे, मळगाव सरपंच सौ.स्नेहल जामदार, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे ग्रामपचायत सदस्य धर्माजी गावडे, जयराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुहास गावडे, रेल्वे कर्मचारी राधाकृष्ण मांजरेकर आणि त्यांचे सर्व रेल्वेचे कर्मचारी सहकारी, मुंबई विद्यापीठाचे प्रा.अमय निर्मळे, प्रा.पुनम गायकवाड व त्यांचे सर्व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
