बटालियन लेव्हल ड्रिल स्पर्धेत गोगटे-जोगळेकर कॉलेज अव्वल
⚡कणकवली ता.२४-: तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून दळवी महाविद्यालय व एनसीसी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग यांच्यावतीने एनसीसी ५८ महाराष्ट्र बटालियन लेवल परेड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आर्मी ऑफिसर, 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग जितेंद्र तिवारी
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अध्यक्ष मनोज गुळेकर , प्रभारी संचालक सिंधुदुर्ग उप परिसर व समन्वयक दळवी महाविद्यालय श्रीपाद वेलिंग हे उपस्थित होते.
दरवर्षी दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन ‘सुभाष दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
यादिवशी परेड स्पर्धा आयोजित केली जाते. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी हि नाविन्यपूर्ण संकल्पना महाविद्यालयात रुजवली .यावर्षी एनसीसी ५८ महाराष्ट्र बटालियन लेवल परेड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयगीता सोबत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून झाली.वरिष्ठ प्राध्यापक
हेमंत महाडीक यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
“नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठे योगदान दिले होते, त्यांचा वारसा नवीन पिढ्यांनी घ्यावा, म्हणून हा दिवस दळवी महाविद्यालयात साजरा करण्यात येतो”. असे ते म्हणाले.
मा. मनोज गुळेकर “ज्यांच्यामुळे आपण आहोत ,भारतीय असण्याचा ज्यांच्यामुळे, आपण अभिमान बाळगतो अशी आपली इंडियनआर्मी. माणूस जन्माला येतो, मरतो पण खर्या अर्थाने ते आयुष्य जगतात”. असे ते म्हणाले.
मा. श्रीपाद वेलिंग “ सुभाष दिवस, सतीश कथामाला असे नावीन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात, त्याचे सर्वश्रेय महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांना जाते.असे उपक्रम राबवणारे दळवी महाविद्यालय हे सिंधुदुर्गातील एकमेव कॉलेज असेल” असा आशावाद व्यक्त केला.
यानंतर जितेंद्र तिवारी यांनी स्पर्धेचा निकाल वाचून दाखवला. अनुक्रमे पुढील प्रमाणे.प्रथम गोगटे- जोगळेकर कॉलेज रत्नागिरी ,द्वितीय-कणकवली कॉलेज कणकवली
तृतीय-दळवी कॉलेज तळेरे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्राध्यापक नरेश शेटये यांनी केले तर आभारप्रदर्शन गौरेश आयरे सीनियर अंडर ऑफिसर दळवी कॉलेज यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गा सोबत आदर्श एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
कणकवली:दळवी महाविद्यालय आयोजीत ‘सुभाष दिवस’ साजरा करताना आर्मी ऑफिसर जितेंद्र तिवारी मनोज गुळेकर, श्रीपाद वेलींग व एनसीसी कॅडेट.
