कुडाळ-: श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास संपर्क व समर्पण अभियानात आज रामरथाचे कुडाळला आगमन होणार आहे. हा रथ संध्याकाळी चार वाजता नक्षत्र टाॅवर येथील राममंदिर कार्यालयासमोर येणार असून, तिथून गांधी चौक, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भैरव मंदिर, एस्. एन्. देसाई चौक, गवळदेव, पोलीस स्टेशन, जिजामाता चौक मार्गे परत कार्यालयासमोर येणार आहे. यावेळी भाविक युवक युवती महिला पुरूषांनी यात सामील व्हावे असे आवाहन नगर अभियान प्रमुख श्री. अविनाश पाटील सर यांनी केले आहे.
*श्री राम रथाचे आज कुडाळ मध्ये होणार आगमन
