श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधूदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी
माहीती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय टेकफेस्ट 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी क्विज कॉम्पिटिशन,वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी ,मोबाईल व्हिडिओग्राफी तर दुसऱ्या दिवशी डी बगींग, ब्लाइंड टायपींग, व पीपीटी प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख,सौ अक्षता गोडकर व संगणक शास्त्र विभाग प्रमुख सौ. विभा गवंडे त्याचबरोबर बरोबर विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल गावडे व महादेव परब यांनी विभागाचे वतीने केले आहे तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
कुणाल गावडे 9403937942
महादेव परब 7378731816
