महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवगड तालुकाध्यक्ष”पदी” पत्रकार विष्णू धावडे यांची नियुक्ती

तर उपाध्यक्ष”पदी”केदार सावंत व सचिव”पदी”सागर जोईल तर खजिनदार”पदी सुप्रेम सनये यांची नियुक्ती..

देवगड :-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे सभा पार पडली.यादरम्यान देवगड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये तालुकाध्यक्ष”पदी” विष्णू धावडे,सचिव”पदी”सागर जोईल तर उपाधक्ष”पदी” केदार सावंत,सहसचिव”पदी” गुरुप्रसाद मांजरेकर,खजिनदार”पदी सुप्रेम सनये तर सदस्य म्हणून प्रसाद बागवे,राजेंद्र साटम,रत्नदीप कांबळे,विक्रम सनये,नागेश दुखंडे आदीं पत्रकाराची यावेळी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी,सचिव शिरीष नाईक,खजिनदार संजना हळदिवे, सहखजिनदार संजय भाईप,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,कणकवली सचिव रोहन पारकर उपस्थित होते.तर नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page