ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे संताप
मालवण दि प्रतिनिधी
कुडोपी बुधवळे या अंदाजित पाच किमी रस्त्याचे महिन्या भरापूर्वी झालेले बिबिएम चे काम उखडून माती दिसू लागली आहे. यामुळे या बोगस कामा बद्दल ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत मालवण माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी ग्रामस्थांसमवेत रस्त्याची पहाणी करुन
तातडीने रस्त्याचे काम योग्य प्रकारे करून न दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी त्यांच्या सोबत बुधवळे ग्रामपंचायत सदस्य बंडू पडवळ,माजी सरपंच तुषार पाटणकर तसेच इतर महिला आदी उपस्थित होते.
कुडोपी बुधवळे जोडणारया रस्त्याचे महिन्या भरापूर्वी बीबीएम काम करण्यात आले होते. मात्र सध्यस्थितीत रस्ता उखडून गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुस्थितीत न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा कुडोपी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
