वरसकर विद्यामंदिरची श्रावणी चव्हाण अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रथम

⚡मालवण ता.११-: वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी कमलेश चव्हाण हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवित यश मिळविले आहे.

या यशाबद्दल श्रावणी व तिचे मार्गदर्शक महेश परब, शैलेश मुळीक, दिव्यता परब यांचे वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे, शालेय समिती चेअरमन केशव परुळेकर, पालक – शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, मुख्याध्यापक तानाजी पाटील, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page