साडे चारशे वर्षाची आहे परंपरा
सडूरे दडोबाच्या पायथ्याशी वास्तव्य;माणसांसह पाळीव पशू, पक्ष्यांचा समावेश
⚡वैभववाडी ता.०५ संजय शेळके-: 450 वर्षाची परंपरा जपत दरवर्षी गावपळण करणाऱ्या शिराळे गावाच्या गावपळणीला पौष महिन्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये बुधवारपासून सुरुवात झाली. गावपळणी दरम्यान शिळ्यावासीय पाळीव प्राणी पशु पक्षासह आणि धान्य साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबाच्या पायथ्याशी वास्तव्य करून राहत आहेत या गावपळणीमध्ये एक दिवसाच्या बालकासह आबालविरुद्धही सहभागी झाले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी शहरा पासून 15किमी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. शिराळे गावातील जागृत देवस्थान असलेल्या गांगेश्वर देवाच्या हुक्मणी ही गावपळन होते. ही गावपण म्हणजे ग्रामदैवत गांगोदेवाचे वार्षिक ग्रामस्थ समजतात पौष महिन्यामध्ये होती. असलेली ही गाव पळन पाच किंवा सात दिवसाची असते. यावेळी बुधवारपासून गाव पळणीला सुरुवात झाली आहे. शिराळेवाशीय पाच किंवा सात दिवसाला लागणारा धान्य साठ्यासह जनावरे पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात. व सडुरे गावाच्या हादीमध्ये म्हणजेच
दडोबाच्या पायथ्याशी उघड्या मळराणामध्ये झोपड्या बांधून वास्तव करतात. दरवर्षी पौष महिन्यामध्ये ही गावपळण असते. सोमवारी गांगो देवाला कौल लावून हुकूम घेण्यात आला. आणि नंतर सडुरे गावाच्या हद्दीत उघड्या रानावर झोपड्या बांधण्यात आल्या गाव पळणीच्या एक दिवस आधी घरामध्ये गोड जेवण करून बाहेर पडण्यात येते हे शिराळे वाशिय बुधवारी घरामध्ये गोड जेवण करून सायंकाळी तीन वाजता गावाबाहेर पडले गुरुवार हा गाव पळणीचा पहिला दिवस आहे. ज्या दिवशी घरातून बाहेर पडले जाते तो दिवस गृहीत धरला जात नाही कारण घरातील चुलीमध्ये विस्तव (आग )असते या गावपणीमध्ये घरातील लहान थोर सर्व सहभागी होतात. गाव पळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा आंब्याच्या झाडाखाली भरवली जाते गावात एसटी बस सुद्धा जात नाही गाव पळणीत जनावरे सुद्धा गावाकडे फिरकत नाहीत.
गावपळणी दरम्यान लगत असणाऱ्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाणी पितात 30 ते 35 झोपडे असून एकमेकांच्या झोपडीला झोपडे लागून बांधल्या असतात. त्यामुळे दिवस रात्र सर्व लोक एकत्र राहतात. गावपळून खेळीमेळीच्या वातावरणात रहुन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटत असतात.
गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर दोन दिवसात का पण केली जाते गाव पळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कोणीही ग्रामस्थ गावात पाऊल ठेवत नाही. कारण या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवांची सभा भरते असा ग्रामस्थांचा समज आहे. तीन दिवस ग्रामस्थ गावात जात नाहीत तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा आपले घरदार ग्रामस्थ पाहून येतात पण गावात राहत नाहीत तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो त्यानंतर गावभरणी होती. एकूण पाच दिवस किंवा सात दिवसाची गाव पण करणारे शिराळे गाव आहे दरवर्षी गाव पण करणारे एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे गाव आहे ह्या ग्रामस्थांचा आपल्या ग्रामदैव गांगोवर मोठी श्रद्धा आहे. असे जानकर ग्रामस्थ सांगतात ही गाव पण म्हणजे आमच्या गागेश्वराचे वार्षिक आहे असे सांगितले जाते.
शिरगाव सडुरे गावाचा महसूल गाव असून सडुरे शिराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे.शिराळे गावात 80 कुटुंब असून सुमारे 350 लोकसंख्येचा असणार गाव आहे.
