मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देवू नका

बांदा नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना निलेश राणे, राजन तेली यांनी दिल्या शुभेच्छा

बांदा/प्रतिनिधी
माजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता अपेक्षित विकासकामे करा असा सल्ला दिला.
यावेळी सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, नूतन सरपंच प्रियांका नाईक, विद्यमान सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, रुपाली शिरसाट, भाजपचे सरचिटणीस दादू कविटकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, मकरंद तोरसकर, शैलेश केसरकर, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते.
श्री राणे यांनी शुभेच्छा देताना वरिष्ठ पातळीवरून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page