बांदा भाजपने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केले होते आयोजन
बांदा/प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत आयोजित अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ही स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. रंगभरण-बालवाडी ते दुसरी गट- प्रथम – सई सुभाष दळवी, द्वितीय – रिदित राकेश गावडे, तृतीय – ओम विठ्ठल सावंत, उत्तेजनार्थ – समर्थ संदीप नार्वेकर. तिसरी ते पाचवी गट – प्रथम – तईबा सलीम शहा, द्वितीय – अन्वयी आशिष पवार, तृतीय – मयुरेश महेश हवालदार, उत्तेजनार्थ – मित राजेश विर्नोडकर, नविका दिवाकर मावळणकर, सहावी ते आठवी गट- प्रथम – चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, द्वितीय – प्राची मनोहर गवस, तृतीय – निधी सुनील राठोड, उत्तेजनार्थ – प्राप्ती प्रवीण प्रभू, गीत सागर बहुलीकर
चित्रकला स्पर्धा, खुला गट, प्रथम – तन्वी सूर्यकांत कुडव, द्वितीय – समी सूरज राऊळ, तृतीय – अरविंद आशुतोष भांगले, उत्तेजनार्थ – समर्थ हनुमंत शिरोडकर. मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, नूतन सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, श्रेया केसरकर, रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, उमांगी मयेकर, केदार कणबर्गी, शैलेश केसरकर, सुनील राऊळ, प्रविण नाटेकर, सर्वेश मुळ्ये आदिसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो :-
