राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मयुरेश नाईक, केशर निर्गुण उपविजेतेपद

दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड*

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आयोजित, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी मयुरेश तुळशीदास नाईक याने उपविजेतेपद पटकावले तर मुलींच्या गटात सावंतवाडी च्या केशर राजेश निर्गुण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा १९ वर्षाखालील मुले व मुली या गटात खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत सिंधुदुर्गातून चार खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मोलाचेतांत्रिक सहकार्य लाभले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, श्री. विजय शिंदे सौ. मनीषा पाटील, श्याम देशपांडे, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव श्री. योगेश फणसळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

You cannot copy content of this page