चित्रकार अनिल आचरेकर यांचे भंडारी हायस्कूलमध्ये प्रात्यक्षिक रंगले

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील भंडारी हायस्कूल मालवणचे माजी विद्यार्थी, मुंबई येथील निवृत्त कलाशिक्षक अनिल आचरेकर यांनी मालवण येथील भंडारी हायस्कूल मधील ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आज प्रात्यक्षिकासह इंटरमिजीएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला मार्गदर्शन केले. यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री आचरेकर यांनी वस्तूचित्र रंगकाम प्रात्यक्षिक करून दाखवले… यावेळी पर्यवेक्षक एच बी तिवले कला शिक्षक अरविंद जाधव उपस्थित होते एलिमेंट्री ग्रेड परीक्षेचे गतवर्षीय तसेच विद्यमान विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला संस्थाचालक विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला

You cannot copy content of this page