जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जॉयसी फर्नांडीस प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२९-: पंचशील ट्रस्टचे संस्थापक संजय बलवंत खोटलेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जॉयसी फिलिस फर्नांडीस हिने प्रथम तर याच स्कूलच्या गायत्री वरगावकर, श्रुतिका जुवलेकर आणि श्रुती शेवडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना प्रा. वैभव खानोलकर व अजित केरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेत जिल्ह्यातील १७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर, सचिव रमेश नरसुले यांच्यासह संस्था पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.
You cannot copy content of this page