सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी केले स्वागत
⚡कणकवली २८-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटणमध्ये भाजप पक्षाला धक्का देत भाजप पक्षाच्या कणकवली तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी व खारेपाटण ग्रामपंचायत माजी सदस्या तसेच खारेपाटण सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक सौ. उज्ज्वला चिके आणि त्यांचे पती खारेपाटण गावचे माजी सरपंच व खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष वीरेंद्र चिके यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य बँकेचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हातात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाने खारेपाटण विभागात ग्रामपंचायत निवडणुकित अचूक रणनीती आखात विविध पक्ष कार्यकर्त्यांना शिवसेनेकडे खेचत सत्ताधारी भाजप पक्षाला एकप्रकारे धक्का देण्याचे काम सुरू केले असून आज खारेपाटण शिवसेना शाखा कार्यलयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कणकवली उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर, जेष्ठ शिवसैनिक अनंत गांधी,बाळा शेट्ये,विभागप्रमुख दयानंद कुडतरकर,उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत,प्रणय उपाध्ये, तेजस राऊत आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खारेपाटण येथे शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यर्त्यांची नावेपुढीलप्रमाणे — हंजर माहमूद ठाकूर,अक्षय चिके,पूनम चिके, संतोष कांबळी,सीमा ठुकरुल,साक्षी चव्हाण,विधाखा ठुकरुल,कल्पना शिंदे,जयश्री शिंदे,शोभा ठुकरुल, अंजली गोसावी,तृप्ती गोसावी,रजनी गोसावी,विमल चव्हाण,राघू ठुकरुल, रमेश चिके,राजेंद्र चिके,सौ.रुची चिके रमेश चिके,राजू चिके, प्रज्योत मोहिरे,सुजय पाटणकर आदी नव्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
भाजप पक्ष ज्या उमेदवारांना सरपंच पदाची उमेदवारी नाकारतो ते उमेदवार सरपंच म्हणून निवडून येतात.असा खारेपाटण ग्रामपंचायतीचा इतिहास आहे. त्यामुळे खारेपाटण मध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचाच विजय होईल असे प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केले.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या निवडणुकी मध्ये सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून यावेळी शिवसेना पक्षाकडून सौ. उज्ज्वला चिके यांचे नाव जाहीर करण्यात आले.
खारेपाटणमध्ये झालेल्या पक्ष प्रवेशावेळी एकूण २५ कार्यकर्त्यानी शिवसेना पक्षात प्रवेश केला
खारेपाटण सरपंच पदाचे आपण भाजप पक्षाकडून प्रमुख दावेदार असताना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली.एक प्रामाणिक महिला कार्यकर्त्यावर भाजप पक्षामध्ये झालेला हा अन्याय असून भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी आपली दखल न घेतल्यामुळे मी व माझे पती तसेच माझ्यासोबत महिला कार्यकर्त्या यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला असून यापुढे आपण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महिलांचे संघटन वाढविण्यासाठी व महिला सक्षमीकरणसाठी काम करणार असल्याचे भाजप पक्षातून शिवसेना पक्षात आज प्रवेश केलेल्या खारेपाटण महिला कार्यकर्त्या सौ.उज्ज्वला चिके यांनी यावेळी सांगितले.
