सीईओ नायर यांच्याकडून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन

अध्यक्ष सावळाराम अणावकर यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २४
सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर आज झालेल्या सकारात्मक चर्चेत निवृत्ती वेतन दरमहा १ तारखला खात्यावर जमा करण्याचा तसेच जानेवारी २०२३ पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्नावर योग्य ती कार्यवाही केली जाईल . असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले असल्याची माहिती सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिली.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे नियमित निवृत्ती वेतन व अनेक वर्षे प्रलंबित असलेली आर्थिक देयके यासह विविध प्रश्नांबाबत शिक्षक असोसिएशनच्या वतीने अनेक वेळा निवेदने देण्यात आली तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली तरीही कोणतेही प्रश्न न सुटल्याने सेवानिवृत्त शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचे जाहीर केला होते याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते .

या चर्चेसाठी प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर,प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते तर शिक्षक असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सावळाराम अणावकर ,उपाध्यक्ष प्रकाश दळवी, सुधाकर खानोलकर, भरत आवळे, घनश्याम वाला वलकर आदि उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत
सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे विलंबाने मिळणारे निवृत्ती वेतन, निवड श्रेणीचा लाभ, रजा रोखीकरण, गटविमा रक्कम, निवृत्ती वेतनातून चुकीची वसुली, पुरस्कार प्राप्त शिक्षकांची वेतन वाढ, आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी
सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जानेवारी २०२३ पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्नावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच दरमहा ऑनलाइन पद्धतीने १ तारीखलाच निवृत्तीवेतन खात्यावर जमा करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन दिले असल्याची माहिती सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी आज दिली.

You cannot copy content of this page