आमदार नितेश राणे : प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराची संधी
⚡देवगड ता.२४-: कोकणात येणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कोकणवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट असून महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मोठा प्रकल्प कोकणात आणला जात आहे. या प्रकल्पामुळे येथील बेरोजगारी दूर होईल त्याकरिता या प्रकल्पात यापूर्वी समाविष्ट केलेली राजापूर तालुक्यातील विरोध असलेली वगळून अन्य गावे तसेच देवगड तालुक्यातील गावे यांचा समावेश करून बारसु व सोलगाव येथील गावात जमीन संपादित करण्यापूर्वी राजापूर व देवगड मधील गावांमध्य हा प्रकल्प प्रस्तावित होता त्या गावांना न्याय मिळावा व येथील तरुणांना रोजगार संधी मिळावी यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देऊन त्या संदर्भात आपण माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत संपर्क साधून या मागणीबाबत आपण विशेष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते .यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार अजित गोगटे जिल्हा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा सरचिटणीस अरीफ बगदादी , जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, प्रकाश राणे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना आमदार नितेश राणे म्हणाले कोकण रिफायनरी संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये ग्रीनरिफायनरी यांनी प्रकल्प होत असल्याचे सांगून त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे अशी माहिती दिली या ग्रीनरिफायनरी प्रकल्पाचे कोकणात आपण स्वागतच करत असून कोकण वासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा मोठ्या प्रकल्प कोकणात येत आहे या प्रकल्पामुळे बेरोजगारी दूर होणार असून या प्रकल्पाकरिता बारसु व सोलगाव येथील जागा भूसंपादित करण्यापूर्वी राजापूर मधील विरोध असलेली गावे वगळून अन्य गावे व देवगड तालुक्यातील प्रस्तावित असलेली गावे या ग्रीन रिफायनरी प्रकल्पात समावेश करून त्या गावांना न्याय मिळावा .जेणेकरून येथील बेरोजगारांना रोजगार मिळेल .यासाठी विशेष प्रयत्न झाला पाहिजे व या संदर्भात आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले .
यापुढे बोलताना आमदार त्यामुळे आम. नितेश राणे म्हणाले ,रिफायनी प्रकल्प हा ग्रीन रत्नागिरीत न होता नाणार वगैरेचा काही भाग वगळून अन्य गावांचा समावेश या प्रकल्पात केला जावा. जेणेकरून त्या प्रकल्पातील या भागांमध्ये या हॉस्पिटल, बंदर ,तसेच कर्मचारी निवासस्थान व उर्वरित व्यवसाय हे मार्गी लागतील त्या उर्वरित जमिनी ही वापरल्या जातील.हा प्रकल्प रत्नागिरीतील एकाच भागात न होता त्यातील त्यात या भागाचा वापर केला जाईल असे सांगून कोकणात या प्रकल्पात रत्नागिरी ,राजापूर, देवगड तालुक्यातील भागाचा समावेश करण्याकरिता प्रयत्न केला जाईल दिला यात राज्य सरकार व केंद्र सरकारचे नियोजन करणार असून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे,पेट्रोलियम मंत्री प्रधानमंत्री कार्यालय हे सर्व एकत्रितपणे येऊन या प्रकल्पाचे नियोजन कसे होईल त्याकरिता प्रयत्न करून त्यानुसार तो केला जाणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार अशी सुचवाच केले होते त्यामुळे राजापूर तालुक्यातील विरोध असलेली गावे व अन्य गावातून तसेच देवगड तालुक्यातील गावातून कार्यकर्त्यांमधील नाराजी व्यक्त केली गेली आहे या प्रकल्पात या राजापूर तालुकायतील नाणार विरोध असलेली गावे वगळून राजापूर व देवगड तालुक्यातील गावांचा समावेश होईल त्यावेळी रोजगार निर्मिती खऱ्या अर्थाने होणार आहे. केंद्र सरकार हे कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असून कोकणचा विकास केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होईल असे आत्मविश्वासित त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
