नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात देवगड महाविद्यालयामध्ये ३ डिसेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

⚡देवगड ता.२३-: शिक्षण संस्थांची नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भाने तयारी या विषयावर देवगड महाविद्यालयामध्ये ३ डिसेंबर २०२२ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक अर्थात सर्वांगीण प्रगतीतून देशोन्नती साधण्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अमलबजावणी व्हावी याकरिता शैक्षणिक संस्थांची पूर्वतयारी होणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) च्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षण संस्थांच्या परिक्षणाचा भाग म्हणून वार्षिक एक्यूएआर् मध्ये विचारल्या जाणाऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय उच्चतस्तर विद्या अभियान (रुसा) चे मुख्य सल्लागार मा. डॉ. विजय जोशी (मुंबई), आयक्यूएसी क्लस्टर इंडियाचे मार्गदर्शक डॉ. अयुब शेख (खेड, रत्नागिरी) आणि डॉ. दीपक ननावरे (सोलापूर) या चर्चासत्रामधून मार्गदर्शन करणार आहेत.

उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांसाठी (संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, IQAC समन्वयक आणि सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी ई.) सदरचे चर्चासत्र उपयुक्त ठरेल. सर्वांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नाव नोंदणी करिता देवगड कॉलेजचे ग्रंथपाल प्रा. शेवाळे यांच्याशी संपर्क साधावा (९६२३६४८४७०).

You cannot copy content of this page