६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्ग जिल्हा फेरी मालवणमध्ये

१५ ते १९ नोव्हेंबर आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्गची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर दि. १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मालवण नाट्यगृह स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून मालवणचे रंगकर्मी संजय शिंदे काम पाहत आहेत. सिंधुदुर्ग केंद्रावर यंदा नाट्यरसिकांसाठी १५ नाटकांची मेजवानी मिळणार आहे. जास्तीत जास्त नाट्यप्रेमीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शासनाच्या कार्य संचालनालयाचे संचालक यांच्यावतीने सिंधुदुर्ग केंद्र समन्वयक संजय शिंदे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग केंद्रावर होणारे नाट्यप्रयोग:- १५ नोव्हेंबर रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीचे भिंती लेखक विक्रम भागवत, दिग्दर्शक रघुनाथ कदम, १६ रोजी पारा फाउंडेशन, तरंदळे, जि. सिंधुदुर्ग यांचे ‘अमन’, लेखक व दिग्दर्शक चंद्रशेखर मुळये १७ रोजी स्वराच्या फाउंडेशन, मालवण यांचे ‘श्याम तुझी आवस इली रे’ लेखक स्वप्नील जाधव दिग्दर्शक गणेश गावकर १८ रोजी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांचे ‘द प्लान’ लेखक व दिग्दर्शक किरण करवडकर,१९ रोजी श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला-क्रीडा मंडळ, कवठी ता. कुडाळ यांचे या व्याकुळ सध्यासमयी लेखक मनोहर सुर्वे, दिग्दर्शक संतोष सांगळे, २० रोजी श्री ज्ञानेश्वर कला संस्कृती क्रीडा मंडळ, सायचेटेंब नेरुर कुडाळ यांचे ‘मधु माया’ लेखक व दिग्दर्शक साईनाथ नेरुरकर २१ रोजी श्री अधिकारी नाट्य कला क्रीडा मित्रमंडळ, कलमठ यांचे ‘ए, आपण चहा घ्यायचा?’ लेखक च प्र देशपांडे, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, २२ रोजी श्री हनुमान सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, देवबाग यांचे ‘सोडला तर पळता’, लेखक बापू गोपाळ गुंड, दिग्दर्शक : संभाजी कांदळगावकर, २३ रोजी साई कला कला क्रीडा मंच, पिंगुळी यांचे ‘बत्ताशी १९४७’, लेखक आणि दिग्दर्शक केदार आनंद देसाई, २४ रोजी नागरिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान, कुडाळ यांचे ‘मंजू.. तो राजहंस एक’ लेखक व दिग्दर्शक देवेंद्र गावडे, २५ रोजी कलावलय वेंगुर्ले यांचे ऋणानुबंध लेखक मधुकर तोरडमल दिग्दर्शक सुरेंद्र खामकर, २६ रोजी जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ले यांचे ‘खरं सांगायचं तर’ लेखक : उदय नारकर, दिग्दर्शक रमेश नार्वेकर, २७ रोजी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे ‘पासर- पॉन’ लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खानोलकर, २८ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण यांचे ‘बझर’ लेखक चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक अभय कदम, २९ रोजी अक्षरसिषु साहित्य कला मंच, सिंधुदुर्ग- कणकवली याचे सकारा हे महावीरा लेखक विजय चकाण दिग्दर्शक सुहास वरुणकर, आदी नाटके सादर होणार आहेत.

You cannot copy content of this page