विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांचे एसटी कामगार सेनेने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा एसटी कामगार सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा नुतन परिवहन विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या श्री.वासकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. एसटी कामगार असतील किंवा अधिकारी या सर्वांना विश्वासात घेवुनच सिंधुदुर्ग परिवहन विभाग अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी श्री.वासकर यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी सिंधुदुर्ग युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी,वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, सहाय्यक वाहतूक अधिक्षक राजन भोसले, रामचंद्र काळे, अनंत टेमकर, प्रशांत खाडे, संभाजी खोत, प्रशांत माडकर, प्रज्ञा कदम, विनोद गवारी, हर्षवर्धन पाटील, गंगाराम गोरे, निलेश पाटील, सिताराम राणे, रुपेश सावंत, सुनिल चव्हाण, मुरलीधर जगताप, स्नेहल मुंज, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page