*जिल्ह्याच्या विकासासाठी नेत्यांनी केल्या फक्त घोषणा

*जसा हवा तसा केला नाही जिल्ह्याचा विकास; सत्यजित तांबे यांची टीका*

*💫सावंतवाडी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने आज आपण जिल्हात आलो असून तसेच येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष कसा वाढेल या साठी आमचे प्रयत्न असून, येणाऱ्या स्थानिक निवडणूकीवर आम्ही भर देणार असून येणाऱ्या निवडणूकीत तरुणाना संधी देणार असल्याचे मत सत्यजित तांबे यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत मांडले आहे. तसेच ते म्हणाले जिल्ह्याचा विकास जसा झाला पाहिजे तसा न झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हातील नेत्यांनी फक्त मोठ्या घोषणा केल्या मात्र प्रत्यक्ष काही केले नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच येणाऱ्या २०२४ च्या विधनासभा निवडणूकीसाठी आम्ही तिन्ही मतदारसंघांची तयारी करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page