कुडोपी टेंबवाडी येथील युवकाचा पारवाडी नदीपात्रात बुडून मृत्यू

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कुडोपी टेंब वाडी येथील रितेश सुभाष पेडणेकर (वय- 30) या युवकाचा पारवाडी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल घडली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी- रितेश हा काल सकाळी कुडोपी खालचीवाडी येथील पारवाडी नदीपात्रात मासेमारी करण्यास गेला होता. याचदरम्यान त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती वडील सुभाष पेडणेकर यांनी आचरा पोलिसांना दिली. रितेश याला दारूचे व्यसन होते. नशेतच त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, अभिताज भाबल यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह मिळाल्यानंतर तो शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात नेण्यात आला. अधिक तपास एस. व्ही. पुरळकर करत आहेत.

You cannot copy content of this page