निवती मच्छीमारांच्या बोटिंमुळे श्रीरामवाडी मच्छीमारांना अडथळा

कारवाई न केल्यास १७ ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा;श्रीरामवाडी मच्छीमारांचे मत्स्य विभागला निवेदन

वेंगुर्ला प्रतिनिधी- निवती खाडीच्या बाजूला २०० मीटर लांबीच्या सुमारे प्रवाहात निवती ग्रामस्थांनी नांगरुन ठेवलेल्या बोटींमुळे श्रीरामवाडी येथील मच्छिमारांना बोटीच्या वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे संबंधित मच्छिमारांना विरोधात कार्यवाही व्हावी, अन्यथा १७ ऑक्टोबर रोजी मत्स्य विभागासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीराम ग्रामस्थ मंडळ, श्रीरामवाडी यांनी दिला आहे.

  निवेदनात म्हटले आहे की, निवती खाडीच्या बाजूला सुमारे २०० मीटर लांबीच्या प्रवाहात निवती ग्रामस्थांच्या जवळपास १०० बोटी वाहतुकीस व्यत्यय येईल, अशा पद्धतीने नांगरुन ठेवलेल्या आहेत. भरती-ओहोटीच्या काळात नांगरुन ठेवलेल्या बोटींच्या लोखंडी नांगराला श्रीरामवाडी येथील मच्छिमारांच्या बोटी जाता-येता धडकून अपघातग्रस्त होत आहेत. या संदर्भात मच्छिमारांना सूचना देऊनही ते दाद देत नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
You cannot copy content of this page