कणकवली नगरपंचायत येथील नियोजन बैठकीत घेतला निर्णय
⚡कणकवली ता.१९-: गणेश चतुर्थी उत्सव काळात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी विस्कळीत पार्किंग केल्यास कारवाई करावी,काही ठराविक ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसवण्यात यावेत .त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात.त्यामुळे कणकवली शहरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गणेश चतुर्थी पूर्वी योग्य नियोजन करण्यासाठी कणकवली नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले,
व्यापारी संघाचे दीपक बेलवलकर,राजन पारकर, राजू गवाणकर,विलास कोरगावकर,महेश नार्वेकर,योगेश ताम्हाणेकर व शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत समस्या त्यांचे प्रश्न आणि वारंवार लाईट व पाण्याचा प्रश्न जाणून घेतले. त्यावर देखील या बैठकीत तोडगा काढण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनाबरोबर गणेश चतुर्थी उत्सव काळात होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत विस्कळीत पार्किंग केल्यास कारवाई करावी,काही ठराविक ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसवण्यात येईल.त्यादृष्टीनं नियोजन सांगितले.
