स्वातंत्र्याच्या उज्वल इतिहासाला उजाळा हीच खरी देशभक्ती: लेफ्ट. डॉ. राज ताडेराव

 
⚡कणकवली ता.१४-:
      ५६५ संस्थांमध्ये विभागलेला हा देश होता पण आपण एक आहोत ही भावना ब्रिटिश राजवटीत निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीला विरोध करण्याचे काम महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सर्वप्रथम केली. त्याची सुरुवात रामोजी समाजाकडून झाली. कडवट क्रांतिकरकांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असून आपण स्वातंत्र्याच्या उज्ज्वल इतिहासाला दिलेला उजाळा हीच खरी देश भक्ती असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख लेफ्ट. डॉ. राज ताडेराव यांनी केले
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक व इतिहास विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.
        
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,१८२६ मध्ये उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रतिसरकार निर्माण केले. सरकार विरुद्ध जाहीरनामे काढले. परंतु ब्रिटिशांची पाळेमुळे घट्ट करण्याचे काम आपल्याच लोकांनी केले हे दुर्दैव आहे. १८२२ मध्ये लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतून सैनिक निर्माण केले. पुढील काळात अनेक संस्थानिक आपले मानमर्तब राखण्यात मग्न होते. परंतु याच काळात  तंट्या भिल्ल या स्वातंत्र सैनिकाने इंग्रजांविरुद्ध ११ वर्ष लढा दिला. असे अनेक स्वातंत्र्यसैनिक या देशात निर्माण झाले. वयाच्या बारा वर्षापासून भगतसिंग यांनी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. राजगुरू, सुखदेव, लालालजपत राय यांच्याही पराक्रमाची ओळख आपल्याला आहे. हे सर्व क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्याचा उज्वल इतिहास आपण अभ्यासने हीच खरे देशभक्ती असेल असे प्रतिपादन केले.
      
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की, भारत नावाचा देश या जगात नव्हता. त्याचे अस्तित्व भारतीय राज्यघटनेच्या स्वीकृतीनंतर निर्माण झाले. त्यानंतर ५६५ संस्थाने  विलीन करून भाषावार प्रांत रचना करून भारत हे एक संघराष्ट्र निर्माण झाले. १९४७ सालापासून अनेक संकटांना, आवाहनांना सामोरे जात आज ७५ वर्षानंतर एक सुजलाम सुफलाम राष्ट्र जगासमोर आले. असे प्रतिपादन केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोदसिंह पाटील यांनी तर आभार डॉ. विद्या मोदी यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page