हिंदू समाज जागृती मेलव्यात उपस्थितांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.२५-: आजची परिस्थिती पाहता हिंदू समाजाला आत्मसंरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदूनी आता संघटित होऊन येणाऱ्या आक्रमणाला थोपवले पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात हिंदू समाजावरील संकट अधिक गडद होत जाणार असे प्रतिपादन येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये रविवारी झालेल्या सकल हिंदू समाज जागृती मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी केले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अजित फाटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शैलेश पै, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. हिंदू समाजाने नेहमीच सहिष्णुतेची भूमिका घेतली. हिंदुनी कधीही कोणावर आक्रमण केले नाही. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. हिंदू समाजावर विविध आक्रमणाने येतायत. त्यामुळे हिंदूनी जागृत होऊन संघटित झाले पाहिजे. संघटीत शक्तीच्या जोरावर येणारी आक्रमणे थाेपवली पाहिजेत. असे उपस्थित वक्त्यांनी स्पष्ट केले .
प्राध्यापक ठाकरे यांनी हिंदु धर्माला शेकडो वर्षांची परंपरा आहे. कुठलाही धर्म अस्तित्वात नसण्यापूर्वी हिंदू धर्म अस्तित्वात होता. हिंदू धर्माने सहिष्णुतेची शिकवण दिली. मात्र, अलीकडच्या काळात अस्तित्वात आलेले धर्म हिंदू संस्कृतीवर आक्रमण करीत आहेत. हे आक्रमण होण्याची गरज आहे. हिंदुनी स्वतःचे आत्मसंरक्षण, कुटुंबाचे संरक्षण करण्याची वेळ आता आली आहे. हिंदू आतंगवादी असल्याचेे नॅरेटीव्ह जाणीवपूर्वक पसरविण्यात आले. कुठलाही हिंदू आतंकवादी असू शकत नाही.
देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला गेला पाहिजे. सर्वांना एकच कायदा असेल तर प्रश्न निर्माण होणार नाही.. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला न गेल्यास भविष्यात हिंदूंची संख्या कमी होणार आहे. हे संकट वेळीच ओळखले गेले पाहिजे.. असे सांगून ठाकरे यांनी हिंदूंच्या मंदिरांना आश्रयाची गरज आहे.हिंदू बांधव मंदिरांमध्ये एकत्र आले पाहिजेत. जेणेकरून एकामेकाच्या सुखदुःखात समाविष्ट होऊन ते आपल्यावर येणाऱ्या अडचणी दूर करू शकतील.तसेच संघटित होतील. आज आपण बाजारात गेल्यानंतर कोणाकडे खरेदी करतो याचा विचार केला पाहिजे. मंगळवार च्या आठवडा बाजारात काय चालते याकडे लक्ष दिले पाहिजे..
आज सावंतवाडी शहरात ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलींना महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यास कचरत आहेत. या मागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे असेही ठाकरे म्हणाले. .माजी राष्ट्रपतीएपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने काही केल्यास कोणी येत नाही. मात्र टिपू सुलतान अन्य विषयावर ते एकत्र येतात. याचा विचार करण्याची गरज आहे. शैलेश पै यांनी काळ बदलला आहे. सर्वांकडे मोबाइल्स आले आहेत. बदललेल्या काळात आपण बदललो नाही तर आपण शिल्लक राहु की नाही याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.. हिंदू समाजाने संघटित होऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. अजित फाटक यांनी आपण अद्यापही विखुरलेला आहोत.. त्यामुळे हिंदू समाज संघटित होत नाही. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. हिंदू वर संकट घोंगावत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने संघटित झाले पाहिजे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सुनील सावंत, लक्ष्मीकांत कराड उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते भारत मातेचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.
