महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांची मागणी
⚡सावंतवाडी ता.२२-: मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेडसाठी न देता जंगल म्हणूनच अबाधित रहावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.
निवेदनात नाटेकर म्हणाले, मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी असण्याबरोबर आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर मुंबई हे फार महत्वाचे शहर आहे. या शहराच्या मध्यभागी मुबईची शान तसेच संपूर्ण मुंबईला ऑक्सीजनचा पुरवठा करणारे आरेचे जंगल आहे. जगात अशा प्रकारे नैसर्गिक जंगल लाभलेले निसर्गरम्b ठिकाण आहे. साल २०१४ नंतर मुंबई मेट्रोच्या कारगेडसाठी आरे जंगलाची जागा निवडण्यात आली. पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतरही दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्रीच्या अंधारात जंगलातील हजारो झाडे कापण्यात आली. त्यावेळी झालेल्या आंदोलनात २९ पर्यावरण प्रेमींना तुरूंगात डांबण्यात आले होते.
पर्यावरणप्रेमींच्या सुटकेसाठी व आरे जंगलमधील मेट्रोची कारशेड रह होऊन जंगल वाचावे म्हणून झालेल्या आंदोलनात आमचे महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक व त्यांचे सहकारी सुद्धा सहभागी होते. या आंदोलनाची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची ही जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेने या निर्णयाचे स्वागत केले. आपणही तात्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत होता, त्यामुळे या स्वागतार्ह निर्णयाचे श्रेय आपणासही जाते. आपल्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकार मार्फत आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही, अशाप्रकारे घोषणा झाली. सदर घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहे. त्यामुळे मुंबईची फुगे असलेले हे आरेचे जंगल कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेडसाठी न देता जंगल म्हणूनच अबाधित राहण्याची भूमिका आपण घ्यावी, अशी मागणी नाटेकर यांनी केली.
