⚡कणकवली ता.२२-: जीवनविद्या मिशन कणकवलीच्यावतीने रविवार 24 जुलै रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
सद्गुरु श्री वामनराव पै यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सतशिष्य नामधारक प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करतात .कणकवली येथे कराळे यांच्या मातोश्री मंगल कार्यालय येथे 24 जुलै रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाने हा महोत्सव संपन्न होणार आहे
दुपारी 2 वाजता उपासना यज्ञाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून दीपप्रज्वलन, सद्गुरु पूजन, सुख संवाद, विद्यार्थी गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व विद्यमान विश्वस्त श्री बन्सीधर राणे BE ,मुंबई यांचे "कृतज्ञता हेच पुण्य " या विषयावर सायंकाळी 4 ते 5 या वेळेत प्रबोधन आयोजित केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवनविद्या मिशन कणकवलीच्यावतीने करण्यात आले आहे
