गुणवंत प्रांजल लिंगवत हिला सेना पदाधिकाऱ्यांची मदत

विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांचा पुढाकार

⚡सावंतवाडी ता.२२-: वेर्ले येथील होतकरू विद्यार्थिनी कु. प्रांजल सत्यवान लिंगवत हिने दहावीच्या परीक्षेत ९१% गुण मिळवून यश संपादन केले होते. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत व महिला शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. शिवसेना सावंतवाडी शाखेत प्रांजली हिला हे सहकार्य करण्यात आले. या विद्यार्थिनीची आई सौ. शितल लिंगवत या आशाताई आहेत. कोरोना काळात त्यांनी जीवावर उदार होऊन उत्कृष्ट कार्य केले होते.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे, उपतालुका प्रमुख राजू शेटकर, महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी, सुनिता राऊळ उपस्थित होते. यावेळी अपर्णा कोठावळे यांनी शिवसेना नेहमीच होतकरू मुलांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले .

You cannot copy content of this page