⚡कणकवली ता.२१-: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प.पु.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) यांच्या वतीने जीवन आनंद सेवा संचलित संविता आश्रम पणदूर ( कुडाळ ) येथे जावून आश्रमातील निराधार अनाथ बांधवांसाठी नविन कपडे तसेच अन्नधान्य देण्यात आले.
दरवर्षी औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने गुरुपौर्णिमेला नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात.पण यावर्षी निराधार अनाथ बांधवांना मदत मिळावी.अशी औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर यांची संकल्पना होती.ती ट्रस्टच्या सर्व सभासदांनी मान्य करुन अल्पावधीतच ती अनाथापर्यत पणदुर येथे पोचविण्यात आली.
यावेळी पणदूर येथे औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर, सचिव दिपक पावस्कर ,खजिनदार रुपेश कुडतरकर ,माजी जि.प.सदस्य सुधिर नकाशे,जिल्हा शांतता कमिटी सदस्य परशुराम इस्वलकर , प्रविण कुडतरकर , बाबा खांडेकर, दिपक कुडतरकर ,प्रदिप कुडतरकर ,संतोष सावंत,निरज तानवडे आदी सभासद उपस्थित होते.
