वेंगुर्ले येथे वैश्य समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

⚡वेंगुर्ले ता.२०-: वैश्य समाजाच्या वतीने सर्व समाजासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला आहे. विद्यार्थी गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे त्यांना विविध उच्च पदापर्यंत पोहचण्यास प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ले तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे यांनी वेंगुर्ले येथे केले.
 वेंगुर्ले वैश्य समाज वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ व शैक्षणिक आर्थिक मदत कार्यक्रम साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ नार्वेकर, पत्रकार अनिल निखार्गे, जिल्हा कार्यकारिणी सचिव सतिश डुबळे, वेंगुर्ले तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे, उपाध्यक्ष सुहास गवंडळकर, सुरेश भिसे, कपिल पोकळे, अमृत काणेकर, चेतन अंधारी, गणेश अंधारी, राकेश सापळे, पंकज शिरसाट, तन्मय मुळीक आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच वैश्य समाज वेंगुर्ले यांच्यावतीने दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार यावर्षी गंगाराम नाटेकर शिरोडा, अनिल केसरकर वेंगुर्ले, ज्येष्ठ शिक्षिका मधुस्मिता मनमोहन अंधारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी  दशरथ नार्वेकर, अनिल निखार्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कणकवली येथे सुरु असलेल्या श्री श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या चातुर्मासातील सेवेच्या नियोजनाबाबत सुनिल डुबळे यांनी मार्गदर्शन केले व शनिवार ३० जुलै रोजी एक दिवसाची सेवा म्हणून उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page