*💫मालवण दि.२०-:* कोळंब कांदळगाव रस्त्यावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात कांदळगाव येथील दोन महिलेंसह एक युवती जखमी झाली आहे. सुदैवाने रिक्षा चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सायंकाळी साडे चार च्या सुमारास झाला. कांदळगाव बौद्धवाडी येथील शीतल दाजी कदम, वेदांकिता कदम, प्रतिग्या दाजी कदम या तिघीजनी रिक्षा मधून मालवण येथून कांदळगावच्या दिशेने जात असताना कांदळगाव मारुती धाटी येथील उतारावर रिक्षा पलटी झाली. रिक्षा मधील या तिन्ही महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना मालवण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी उपचार केले याबाबत मालवण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली होती.
रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात कांदळगाव येथील दोन महिलेंसह एक युवती जखमी
