बाल न्यायालयात करणार हजर; तर तिसरा संशयित आरोपी फरार
*💫सावंतवाडी दि.२०-:* येथे नेत्र तपासणी साठी आलेल्या दाम्पत्याची बँग काही दिवसांपूर्वीच तीन युवकांनी चोरून नेली होती. अखेर त्यातील दोन्ही युवकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी त्यातील दोन युवकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. यातील एका युवकाला काल , तर एका युवकाला आज ताब्यात घेण्यात आले आहे. तर या चोरी प्रकरणात आणखी एका युवकाचा समावेश असून, तो सद्या फरार आहे. तर पोलिस त्या युवकाचा शोध घेत आहेत. पकडण्यात आलेले दोन्ही युवक हे अल्पवयीन असून, त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्या दोन्ही युवकांनी चोरीची कबुली दिली आहे.
