*💫सिंधुदुर्गनगरी दि.२-:* जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनुसूचित जाती म्हणजेच महार, चांभार आणि नवबौद्ध या वस्त्यांमध्ये नाविन्यपूर्ण योजना आमच्या जिल्ह्याचे आत्तापर्यंतचे सर्व जिल्हा नियोजन समितीचे सभासद, सदस्य, पदाधिकारी यांनी राबवलीच नाही, किमान चालू वर्षापासून तरी लाभ मिळावा म्हणून दिनांक २६ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून एक दिवस उपोषण करणार आहे. तरीही दखल घेतली नाही तर दिनांक २८ जानेवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात स्पीकर लावून आळीपाळीने बेमुदत घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा बुद्धिस्ट सोसायटीच्यावतीने देण्यात आला. कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी १७ या वेळेत हे आंदोलन सुरू राहणार आहे.
विशेषत: (१) अनुसूचित जाती(महार, चांभार) आणि नवबौद्ध समाजाला नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आराखडा तयार करून एक प्रत आम्हाला दिली जात नाही (२) शासनाने दिलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात यावी या योजनेतून जिल्हा परिषद समाज मंदिर, तालुका स्तरावरील बौद्ध विहारामध्ये संबंधित संस्था चालकांशी विचार विनिमय करून इंटरनेट सेवा उपलब्ध करून देईपर्यंत. (३) सिंधुदुर्गवाशियांच्या आरोग्यासाठी हाफकिन संस्थेला दिलेल्या रुपये एक कोटी ची उपकरणे मिळेपर्यंत (४) सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक विकास कमिटी स्थापन करून त्या कमिटी मध्ये सदस्य करेपर्यंत (५) डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा नोंदणी क्रमांक ३२२७/९८२एफ चा अनाधिकारे वापर करणारांवर मा. पालकमंत्री महोदयांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजी च्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल होईपर्यंत (६) सर्व साधारण गटांच्या नावाखाली नाविन्यपूर्ण योजनेतून नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईपर्यंत, (७) नाविन्यपूर्ण योजनेतून कायमस्वरूपी मालमत्तेचे मा. पालकमंत्री महोदयांकडून उद्घाटन होत नाही तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
