पर्यावरणपूरक संदेशासाठी ११०० किमी सायकल प्रवास करणाऱ्या नितांतचा सत्कार

⚡कणकवली ता.१०-:
पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी कणकवली ते मुंबई व मुंबई ते कणकवली असा जवळपास ११०० किमीचा सायकलप्रवास करणाऱ्या वरवडे येथील उर्फ नितांत उर्फ सिद्धू राजन चव्हाण या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा सत्कार कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे करण्यात आला.
कणकवली तालुका पत्रकार समितीची बैठक येथील भवानी सभागृहात समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. बैठकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदासाठी संतोष राऊळ यांच्या नियुक्तीचा ठराव करण्यात आला.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाची पदाधिकारी निवड लवकरच होणार असून त्याविषयीही चर्चा करण्यात आली. अध्यक्ष देसाई यांनी जमा खर्चाची माहिती दिली. बैठकीस जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, तालुका पत्रकार समितीचे सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर, संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे, अजित सावंत, भगवान लोके, रंजीता तहसीलदार, तुषार सावंत, भास्कर रासम, स्वप्नील वरवडेकर, संजय पेटकर, दिगंबर वालावलकर, तुषार हजारे, राजन चव्हाण, उमेश परब, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page