तळवडे येथील विकास कामांकरिता 47 लाखाचा निधी मंजूर

आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर

⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: तळवडे-नेमळे मार्गावर तळवडे बाजारपेठ या रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ग्रामस्थांना मोठी गैरसोय सोसावी लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन तळवडे या ठिकाणी गटार दुरुस्ती आणि रस्ता दुरुस्ती या विकास कामांकरीता 47 लाख रुपये एवढा निधी आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने अर्थमंत्री अजित पवार,पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत मंजूर झाला आहे.

गेली अनेक वर्षे बाजारपेठेत पाणी साचत असल्याने व्यापारीवर्ग यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत होती. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी अनेक वर्षे तळवडे गावातील ग्रामस्थ, वाहनचालक व्यापारीवर्ग यांच्याकडून मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी गटार दुरुस्ती आणि रस्ता दुरुस्ती कामांकरीता 47 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. तसेच बाजारपेठेमधील गटार निर्मिती पण लवकरच केली जाणार असल्याची माहिती शिवसेना शाखाप्रमुख अनिल जाधव यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनेतून तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरणाचे काम मंजूर झाले असल्यामुळे तळवडे गावातून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page