वेंगुर्ल्यात भव्य सायकल रॅली संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: नेहरु युवा केंद्र वेंगुर्ला व वेंगा बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून रोजी साई मंगल कार्यालय, जुना स्टॅण्ड, दाभोली नाका, हनुमान मंदिर, लौकिक हॉटेल, रामेश्वर मंदिर स्टॉप ते पुन्हा साई मंगल कार्यालय अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नेहरु युवा पुरस्कार विजेते डॉ. संजिव लिगवत यांच्या हस्ते करण्यात आले.

  प्रथम आलेल्या २० सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी वेंगा बाँईजचे मार्गदर्शक डॉ.प्रल्हाद मणचेकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, डॉ. राजेश्वर उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परूळेकर, अमित म्हापणकर, मुकुल सातार्डेकर, अनिकेत कुंडगीर, वैभव शिंदे, कार्तिक दरेकर, युवराज जाधव, प्रजापत, मुक्त्यार अत्तार, नेहरू युवा समन्वयक श्रीहर्षा टेंगशे, विश्वजित जाधव, प्रथमेश पेडणेकर व मदर टेरेसा हायस्कूल वेंगुर्लाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
You cannot copy content of this page