वायंगणी येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-: वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त २० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि २० मार्च रोजी सकाळी ५ वाजता दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वाजता नित्य आरती, सकाळी ९.०० वाजता अभिषेक, सकाळी ११.०० ते सायं. ६.०० पर्यंत स्थानिकांची भजने, दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८.०० वाजता श्री आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडी यांचे ट्रिकसीन युक्त, भक्तीमय दिंडीनृत्य सादर होणार आहे. बुवा भाई तावडे, पखवाज वादक प्रथमेश तावडे, तबला वादक तेजस घाडी यांची साथ मिळणार आहे.

या उत्सवास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी अध्यक्ष दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनील खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सदस्य रामदास प्रभू, पंडित खोत, सुधीर घारे, सविता राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page