बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

पुणे दि.०८-: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे.

तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04 टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. 95.35 टक्के विद्यार्थिनी तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

You cannot copy content of this page