⚡सावंतवाडी ता.०८-: कोल्हापूरहुन सावंतवाडीच्या दिशेने दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीला बाहेरचावाडा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला असून, गाडी गटारात कलंटली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर ही गाडी कलंटल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले आहे.
दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीला बाहेरचावाडा येथे अपघात
