वेंगुर्ला-कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याची दुर्दशा

पालकमंत्री व आमदार यांनी या रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी

वेंगुर्ला ता.०२-:* वजराठ गावातील देवसू या महसूल गावामधील रस्ता व त्या रस्त्यावर असलेला कॉजवे याची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे कामळेवीर देवसू मार्गे होडावडा रस्त्याचे काम त्वरीत करावे, अशी मागणी वेंगुर्ला पंचायत समितीच्या माजी सभापती सुचिता वजराटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

कामळेवीर बाजारपेठेतून देवसू होडावडा मार्गे जाणारा रस्ता कामळेवीर, झाराप, नेमळे, वजराठ, होडावडा, तळवडा या गावांना जोडणारा आहे. या रस्त्यावर देवसू या वाडीमधून असणारा पूल वजा कॉजवे ४० वर्षापूर्वीच असून सद्यस्थितीत तो पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. त्यामुळे देवसू ग्रामस्थांना फार त्रास होत आहे. जुलै २०१९ ला या कॉजवेवर दोन मोठे खड्ड पडले आहेत. सदर बाब वजराठ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना व वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापतींना, जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, माजी सभापती सुचिता वजराठकर आणि शाखा अभियंता याच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच तात्पुरती दुरुस्ती करुन तो कॉजवे टिकणारा नाही. ग्रामस्थांनीही स्वखर्चातून या कॉजवेची दुरुस्ती केली होती. सध्या या मार्गावरुन होणारी वाहतूक बंद आहे. कधीही त्याठिकाणी जीवित व वित्तीय हानी होऊ शकते. याबाबत आपणासही ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. माजी सभापती सुचिता वजराठकर यांनीही प्रयत्न केले आहेत. तरी आपणास विनंती आहे की, या कॉजवेच्या नविन बाधणीसाठी निधी मंजूर करावा.

त्या पुलाच्या नादुस्तीमुळे अपघात झाला तर त्याच्या परीणामास जबाबदार कोण? पुलाची दोन वेळा ग्रामपंचायतीने तर एकदा ग्रामस्थांनी दुरुस्ती केली आहे. आता ते पूल दुरुस्ती करण्यापलीकडे आहे. येणा-या पावसाळयात हे पूल राहिल की नाही ही शंका आहे. सदरचा पुल मंजुर आहे. पण आज त्याची डागडुजी तातडीने करणे महत्वाचे आहे. या पुलामुळे अपघात घडल्यास व अपघातात जिवीत वा वित्तहानी घडल्यास त्यास जबाबदार कोण असा थेट सवाल आता प्रक्षुब्द झालेल्या नागरीकांतून संतापाने व्यक्त केला जात आहे. कारण ग्रामस्थ प्रतिनिधींची आश्वासने ऐकून ऐकून थकले.

न्याय नक्की कोणाकडे मागावा यासाठी नागरीक संभ्रमीत सदर रस्ता ६/७ वर्षे मुख्यमंत्री सडक योजनेत अडकून आहे. दरवर्षी त्याचा क्रमांक खाली-वर होत आहे. कोणाकडे न्याय मागवा म्हणजे आम्हा नागारीकांच्या समस्या पूर्ण होतील हा प्रश्न स्थानिक नागारीकांना पडला आहे. तसेच हा कॉजवे ज्या रस्त्यावरी आहे. तो रस्ता ६० वर्षापूर्वीचा असून याही रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण एकदाही झालेले नाही. या रस्त्यावरुन येता जाता ग्रामस्थांना फार त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गाव जोडणारा हा रस्ता असल्यने या २ किमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणास निधी मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती सुचिता वजराटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page