*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला येथील श्रीमठ संस्थान दाभोली या गुरुपिठात श्री सद्गुरु कृपाप्रसाद प्राप्त्यर्थ श्री गणेश याग, पंचदुर्गा याग व श्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज समाधी संप्रोक्षण विधी सेवा ३ ते ५ जून या कालावधीत संपन्न होत आहे.
दि.३ रोजी सकाळी ७ वा. प्रायश्चित्त, गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, दु. १ वा. आचार्यवरण, प्राकारशुद्धी, देवतास्थापना, गणेश याग, संप्रोक्षण, श्रीमत् पूर्णानंद स्वामी समाधी महापूजा, दु.१.३० ते दुपारी ३.३० पर्यंत भोजन प्रसाद, सायं. ५ वा. कीर्तन भूषण ह.भ.प.विनोदबुवा खोंड (नागपूर) यांचे कीर्तन, सायं.७ वा. धुपारती, दि.४ रोजी सकाळी ७ ते १ या वेळेत लघुरुद्र, पवमान इ. दु. १.३० ते ३.३० पर्यंत महाप्रसाद, सायं. ५ वा. कीर्तन भूषण ह.भ.प.विनोदबुवा खोंड (नागपूर) यांचे कीर्तन, सायं.७ वा. धुपारती, दि.५ रोजी स. ७ ते १ पर्यंत प्रायश्चित, गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, देवतास्थापना, पंचदुर्गा याग, बलिदान पूर्णाहूती, सर्व भक्तांवर अभिषेक, विभूतीवंदन, आरती, गा-हाणे, दु. १.३० ते ३.३० पर्यंत महाप्रसाद, सायं.५ वा. कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांचा भक्तिसंगीत कार्यक्रम, सायं. ७ वा. धुपारती हे कार्यक्रम होणार आहेत.
