कळसुली हायस्कूलच्या १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

कणकवली ता.२४-:* कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली या प्रशालेत सन १९९०/९१ च्या एस.एस.सी.बॅचचा स्नेहमेळावा माजी जि.प. अध्यक्ष आर.बी.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व एन. व्ही. कुलकर्णी विद्यालय पांग्रड माजी मुख्याध्यापक एस.बी. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला

यावेळी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीधर वि. दळवी, उपकार्याध्यक्ष सूर्यकांत रा. दळवी, शालेय समिती चेअरमन के. आर. दळवी, सदस्य नामदेव रा. घाडीगावकर,अतुल दळवी,माजी शिक्षक ए.के. मुलाणी, श्री भोसले , जे.के. पाटील, पी. जी. कदम, डी. जी. तेली, श्यामसुंदर राणे, एस. एस. दळवी, माजी शिक्षकेतर कर्मचारी एम. के. कदम तसेच प्रशालेत सध्या कार्यरत असलेले शिक्षक एस. के. सावळ,सी.जी. चव्हाण, ए. पी. पवार, ए. जी. सावंत,सौ. एम. एम. दळवी, एस.ए. परुळेकर, सी. एम. राणे, शिक्षकेतर कर्मचारी शपी. एस. नाईक त्याचबरोबर सुमारे ४१ माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ सत्रात सर्व मान्यवरांचा व माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यरत शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर चव्हाण यांनी केले सन १९९०/९१ बॅचचे प्रतिनिधी प्रशांत सावंत, संगीता गुरव, राजन मोर्ये, नंदा चव्हाण, प्रमोद घाडीगावकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व स्नेहमेळावा च्या आयोजनासाठी शुभांगी भालेकर, रणजीत सुतार, किशोर राऊत,किशोर गावकर, दिगंबर गोळवणकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच प्रशालेला रुपये २५०००/- निधी भेट दिला.याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. तर माजी जि.प.अध्यक्ष आर.बी.दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करून त्यांच्या भावी जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी विद्यार्थी चंद्रमणी तांबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page