भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांची माहिती; आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
देवगड ता.२३-: रत्नागिरी ग्रीन रिफायनरी चे काम अंतिम टप्प्यात आले असून एमआयडीसी आणि रीफायनरी या दोन्ही संस्था समन्वयाने जागा पाहणी, माती परीक्षण आवश्यक ते क्षेत्र व त्याबाबतच्या अन्य अडीअडचणी यांची माहिती घेणे सुरू आहे .आवश्यक असणारे पाणी अर्जुना नदीवरून असे सुचवले होते परंतु ते पाणी कोयनेतून सोडण्यात येणारे पाणी आणल्यास चिपळूणपासून देवगड पर्यंत जे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते ते नाहीसे करण्याकरिता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो.
त्याच बरोबर अर्जुन नदी आणि अरुणा प्रकल्पाचे पाणी आरक्षित ठेवावे अशी अट घालण्यात आली होती .ते पाणीही वाया जाणारे नाही .आवश्यक असणारे पुरेसे पाणी या भागात उपलब्ध होईल याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करावे या करिता प्रयत्न शील असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
.त्या पुढे बोलताना श्री जठार म्हणाले नियोजित प्रकल्प 20 मिलियन टन एवढ्या क्षमतेची असून यातून ७५ हजार ते १ लाख तरुणांना रोजगार निर्मिती होऊ शकते. याकरिता आवश्यक तो बायोडेटा स्थानिक तरुणांनी गुगल लिंक द्वारे सादर करावा .असे आवाहन करून या रिफायनरी प्रकल्पामुळे सुमारे ६०० बायो प्रॉडक्ट ची निर्मिती होणार आहे त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार ची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
.जेणेकरून प्रत्येक गावातील २० ते २५ तरुणांना या प्रकल्पातून रोजगार प्राप्त होऊ शकतो या बरोबरच आवश्यक असणारे यामध्ये ट्रेंड येथील आ यटीआय मध्ये सुरू करावे अशी आग्रही मागणी करण्यात येऊन आहे यावर्षीपासून आवश्यक असलेल्या सर्व ट्रेंड सुरू सुरुवात करण्यात यावी अशी आपली मागणी असून या या रिफायनरी प्रकल्पामुळे पाण्याचे योग्य ते नियोजन रोजगार नियोजन त्यात अनेक ठिकाणी आरोग्य समस्या दूर करण्या करीताविविध आरोग्य सुविधा ताकतीने वाढ करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांची फायनली व्हावी अशी इच्छा असल्याचे वक्तव्य आम.राजन साळवी यांनी करून या प्रकल्पाला मुख्यमंत्रीआग्रही असल्याने केंद्राकडे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगून स्थानिक खासदारामुळे हा प्रकल्प खर्च वाढला असून तो प्रकल्प रेंगाळला आहे विकासाचा बॅकलॉग दूर करण्याकरता अधिक जोमाने शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या पुढे बोलताना ते म्हणाले वैश्यवाणी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समावेश करावा या करीता वैश्यवाणी मध्यवर्ती संस्थेच्या वतीने एक शिष्टमंडळ ३०मे रोजी दुपारी १ वाजता ओबीसी आयोगाच्या अधिकाऱ्यांशी प्रमोद जठार याचे नेतृत्वाखाली अध्यक्ष का.रा. कोळवणकर,मार्गदर्शक विकास खातु सचिव विकास संसारे विज्ञान भवन दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले..
