अखंड लोकमंच कणकवली आयोजित मुक्त संवाद कार्यक्रम
कणकवली ता.१३-:* समाजात गरिबीमुळे पसरलेले दुःख मोठे आहे.ते दुःख मी माझ्या कवितेतून मांडतो.खोटे बुरखे पांघरून क्रांतीची मशाल पेटवता येत नाही.त्यासाठी मनातुन हुंकार आला पाहिजे,”आता होऊन जाऊदे .”ची भावना मनात निर्माण झाली पाहिजे.मात्र अनेक साहित्यिकांना हे दुःख आणि त्यामागचे सूत्र जाणवत नाही.परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असली तरी तसे वेगळे घडतांना काहीच दिसत नाही अशा शब्दांत कवी लोकनाथ यशवंत यांनी आपली खंत व्यक्त केली.
“हे तर होणारच होत ” हा नवा कवितासंग्रह आपला येत असून त्यात याविषयी अधिक भाष्य केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अखंड लोकमंच कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित मुक्त संवाद कार्यक्रमात कवी लोकनाथ यशवंत बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक,संस्थेचे विश्वस्थ पत्रकार संतोष राऊळ यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
सृजन चे प्रकाशक विजय जाधव,संवादक कल्पना मलये,कवी मोहन कुंभार,संस्थेचे विश्वस्थ, कवी राजेश कदम,विनायक सापळे,शैलजा कदम,आनंद तांबे,समुद्र लोकनाथ यशवंत,किरण कदम, आदी संस्थेचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. यावेळी आता होऊन जाऊ द्या..! ‘आणि शेवटी काय झाले ?’ ‘पुन्हा चाल करू या..!’ या कविता संग्रहावर चर्चा करण्यात आली.कवी लोकनाथ यांची कविता माणूस केंद्रबिंदू मानणारी, समूहनाचा आविष्कार घडविणारी, व्यवस्थेचे अचूक आकलन असलेली, लोकांची, चळवळीचे मोर्चा हे आयुध मानणारी अशी आहे असे लेखिका कल्पना मलये,कवी मोहन कुंभार यांनी सांगितले.किरण कदम आणि विनायक सापळे यांनी यावेळी विविध विषयांवर आपली मते मांडली.
