बाबाजी भिसळे यांना ज्येष्ठसेवा पुरस्कार प्रदान

मालवण ता.२७-:* आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवासंघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात बाबाजी गोपाळ भिसळे ऊर्फ तात्या भिसळे यांना सेवासंघाचा यावर्षीचा ज्येष्ठसेवा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

सर्वात ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांचे हस्ते भिसळे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तात्या भिसळे यांच्या सेवासंघाच्या सतरा वर्षांच्या सेवेचा आढावा लक्ष्मणराव आचरेकर यांनी घेतला. अकरा वर्षे सचिवपद आणि सहा वर्षे अध्यक्षद सांभाळून सेवासंघासाठी भिसळे यांनी तन मन आणि धनही अर्पण केले. आज जो ज्येष्ठनागरिक सेवासंघाचा वटवृक्ष झाला त्यात तात्यांचे योगदान मोलाचे आहे, असे आचरेकर यांनी सांगितले. तात्या भिसळे यांनी आपणास सहकार्य करणाऱ्या असंख्य हातांचे आभार मानले. या सोहळ्याला अशोक कांबळी, चंद्रशेखर हडप, डॉ. सुधीर शिवेश्वरकर, सुरेश ठाकूर, जकारीन फर्नान्डीस, अरुंधती कंबळी, श्रीकांत सांबारी यांच्यासह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक ऊपस्थित होते.

You cannot copy content of this page