आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर वाढलेले वजन जिह्याच्या पर्यटन विकासाठी वापरावे-:बाबा मोंडकर…

*💫मालवण दि.११-:* स्वतःच्या सुरक्षेत वाढ करावीच पण त्याबरोबर जिल्हयात पर्यटन शेत्रात जनतेस अपेक्षित काम करावे . आमदार वैभव नाईक ज्या मतदार संघात आमदार आहेत त्या मतदारसंघात पर्यटनाच्या द्रुष्टीने राज्याचे अर्थकारण बदलण्याची ताकद आहे .जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर स्थानिकांना आपल्या स्वकर्तुत्वावर पर्यटन क्षेत्रात जिल्ह्य़ाचे नाव केले आहे .परंतू ती दूरदृष्टी वैभव नाईक यांनी कधीतरी आत्मसात करावी आणि पर्यटनाचा जिल्हयाचा माईलस्टोन ठरणारा सि-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावावा जे शहाणपण नाणार प्रश्नी स्थानीक आमदार राजन साळवी यांनी दाखविले ते वैभव नाईक यांनी दाखऊन पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करावा असे मत भाजप सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे वायंगणी येथील सी वर्ल्ड प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सरकारने सि- वर्ल्ड प्रोजेक्ट होण्यासाठी अंतिम टप्पा गाठला होता सदर प्रोजेक्ट साठी जागा देण्यास जमीन मालक तयार असून यांचि नोंद राज्यसरकार कडे आहे.त्यामुळे या विषयी वैभव नाईक यानी पाठपुरावा करून सदर विषयी मार्गी लावावा अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे .

You cannot copy content of this page