*💫मालवण दि.११-:* मालवण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा दांडी या प्रशालेस रोटरी क्लब मालवणतर्फे चार संगणक संच प्रदान करण्यात आले. रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर संग्राम पाटिल यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी अँडिशनल गव्हर्नर श्री.प्रणय तेली, दादा कुडतरकर, मालवण रोटरीचे अध्यक्ष अँड.हेमेंद्र गोवेकर, सचिव उमेश सांगोडकर, खजिनदार अभय कदम, रोटरियन डाँ.अजित लिमये, डाँ.लीना लिमये सौ.उत्कर्षा पाटिल, प्रदीप जोशी, चाचा हडकर, सुहास ओरोसकर, भाऊ साळगांवकर, प्रसन्नकुमार मयेकर, महादेव पाटकर, सुविधा तिनईकर, अनिल चव्हाण, रमाकांत वाक्कर, मेघनाद धुरी,अमरजीत वणकुंद्रे, महेश काळसेकर, नारायण धुरी, महेंद्र पराडकर, सन्मेश परब, निखिल गांवकर, समिक्षा कोयंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.रोहिणी मांजरेकर, उपाध्यक्ष हेमंत चिंदरकर, सदस्य दिनकर शेलटकर इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी डिस्ट्रिक गव्हर्नर संग्राम पाटिल यांच्या हस्ते शाळेच्या मुख्या.सौ.विशाखा चव्हाण, उपक्रमशील शिक्षक शिवराज सावंत, रामदास तांबे, सौ.मनीषा ठाकुर यांना रोटरी क्लब फलक प्रदान करण्यात आला.
दांडी शाळेस रोटरी क्लब कडून चार संगणक प्रदान….
