सर्जेकोट शाळेच्या रंगमंच बांधकामाचा शुभारंभ…!

*💫मालवण दि.१०-:* मिर्याबांदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सर्जेकोट या शाळेच्या रंगमंच बांधकामाचा शुभारंभ जि. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद स्व:निधी मधून अडीच लाख रुपये खर्चातून या रंगमंचाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी अनिल न्हिवेकर, मिर्याबांदा सरपंच सौ. निलिमा परुळेकर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे, सुनिल खवणेकर, सौ. सावजी, आरोलकर, सावजी, आचरेकर, पराडकर, श्री. तांडेल, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. लोकप्रतिनिधी विकास कामे करण्यासाठीच असतात मिर्याबांदा सरपंच सौ. परुळेकर गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे गावचा विकास दूर नाही असे यावेळी सरोज परब यांनी सांगत परुळेकर यांच्या कामाचे कौतुक केले. तर सरपंच व ग्रामपंचायत गावच्या विकासाचा कणा असतो त्यांनी प्रामाणिक पणे काम केले तर गावात विकासाची गंगा यायला वेळ लागत नाही, मिर्याबांदा गावात विकासाची अनेक कामे झाली आहेत, असे आणि न्हिवेकर यांनी सांगितले. यावेळी सरपंच परुळेकर यांनी गावात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

You cannot copy content of this page