मसुरे भोगलेवाडी येथे बिबट्या पडला विहिरीत

भक्ष्याचा पाठलाग करताना विहिराचा अंदाज न आल्याने घडली घटना

*💫मालवण दि.०९-:* मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या पाठलागावर असणाऱ्या एका बिबट्याला विहिराचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना मसुरे भोगलेवाडी येथे घडली आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुदेश रावराणे यांच्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या २० ते २५ फूट खोल विहिरीत कोसळला बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वन कर्मचाऱ्याने बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीतून बाहेर काढले.

You cannot copy content of this page